पुणे : सध्या पुणे शहरातील खड्यांची जोरदार चर्चा सुरु झाली असून विविध पक्षाच्या नेत्यांनी याविरोधात आंदोलने सुद्धा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खड्ड्यांच्या विषयावर आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर पुणे शहरात १६ ठिकाणी मनसेने आंदोलन केले. शुक्रवारी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना परखड मत व्यक्त केले.
तसेच या खड्डयांना मतदार जबाबदार आहे, कारण खड्डे असताना ते पुन्हा त्या लोकांना निवडून देत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. आता उच्च न्यायालयाने पुणे मनपाला या विषयावरुन चांगलेच फटकारले आहे. सामाजिक कार्यकर्ते कनिज सुखरानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरूनच कोर्टाने पुणे मनपाला खडेबोल सुनावले आहे.
सदर याचिकेच्या माध्यमातून पुण्यातील खड्ड्यांविषयी सुनावणी झाली. पुणे शहरात ११४ खड्डे असल्याचे गेल्या वर्षी मनपाने म्हटले होते. यावर्षी फक्त ११३ खड्डे असल्याचे मनपाने कोर्टात सांगितले. त्यावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षीचेही खड्डे अद्याप दुरुस्त झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांच्या देखभालची आपली जबाबदारी मनपाकडून पार पाडली गेली नाही, या शब्दांत हायकोर्टाने फटकारत मनपावर ताशेरे ओढले.
एकनाथ शिंदे येत्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार
‘२०१९ उद्धव ठाकरेंनी एकनाथशिंदे यांचं नाव पुढे केल्यामुळे भाजपने युती तोडली’