कोल्हापूर |
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली आहे. शेतकऱ्याला पन्नास हजार का लाख रुपये द्यायला पाहिजे होते, तुमच्या काळात तुम्ही निर्णय का घेतला नाही असा खोचक टोलाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शेतकरी हसले यामुळे उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार होतं त्यावेळी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं शेतकऱ्यांना 25000 मिळाले पाहिजे होते पण ते मिळाले नाहीत अशी टीकाही चंद्रकांत दादा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पण आत्ताच्या सरकारने शेतकऱ्यावर जे जे संकट आला आहे, त्या त्यावेळी मदत केली आहे शेतकऱ्यांना डबल नुकसान भरपाई दिली आहे, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.