Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापूरमधील थेट पाईपलाईन योजना शिंदे- फडणवीस सरकार पूर्ण करणारच – चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य जनतेचे संवेदशील सरकार बनवले आहे, अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी कोल्हापूर थेट पाईपलाईन योजना हे सरकार पूर्ण करेल, असा दावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईन वरून प्रत्येक निवडणूक गाजत असते, महाविकास आघाडी सरकारने केवळ घोषणा करून वेळ काढूपणा केला. मात्र कोल्हापूरच्या अस्मितेचा थेट पाईपलाईन योजना ही शिंदे व फडणवीस सरकारच पूर्ण करेल असा दावाही चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.