Latest Marathi News

BREAKING NEWS

पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने “मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी संचलित अन्नपूर्णा योजने”तील गोर-गरिबांसाठी दिवाळी निमित्त १५१ फराळ मिठाई बॉक्स वाटप

0

बार्शी |

दि.२५ रोजी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या आदेशानुसार, पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी संचलित अन्नपूर्णा योजनेतील गोरगरिबांसाठी दिवाळी सणाचे औचित्य साधून १५१ मिठाई बॉक्स वाटप करण्यात आले.

बार्शीतील जे निराधार, गरजूवंत तसेच ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा नागरिकांना त्यांना घरपोच मिठाई बॉक्सचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारचे सार्वजनिक, सामाजिक कार्यक्रम या पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने वतीने विविध पद्धतीने करण्यात येतात. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सहसचिव मुरलीधर चव्हाण, सदस्य रावसाहेब यादव, व्यवस्थापक महेश मांजरे तसेच पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी तालुका व बार्शी शहर पदाधिकारी,सदस्य, व बळेवाडी, कासारवाडी शाखेचे पदाधिकारी तसेच महिला शहर व तालुका पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष ठोंबरे यांनी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीम यांचा आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.