शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली. या यात्रेमध्ये सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणांच्या जोरावर शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील या यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्यावर जोरदार निशाणा साधला आहे. औरंगाबाद येथील एका सभेत खैरे यांनी दीपाली सय्यदचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात नुकत्याच ठाकरे गट सोडलेल्या दीपाली सय्यद यांच्यावर टीका केली. सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे या चिल्लर नेत्या असल्याचं सय्यद म्हणाल्या होत्या यावरूनच आता खैरेंनी त्यांना टोला लगावला आहे. खैरे म्हणाले,एका लिपस्टिकवाल्या बाईने सांगितलं सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे यांच्याकडे काहीच नाही त्या मीडियाशी बोलल्या असंही खैरे म्हणाले.
दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटातील महिला नेत्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खैरे यांनी सुषमा अंधारे किती गरिबीतून आणि कष्टातून वरती आल्याच सांगितले.तसेच त्या लिपस्टिकवालीला काय समजतं? आता तिला पक्षात घेतही नाहीत ते असा टोलाही खैरेंनी यावेळी सय्यद यांना लगावला. आता या टीकेला दिली सय्यद काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.