Latest Marathi News

BREAKING NEWS

‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर टीका करणाऱ्या या नेत्यांना सोडणार का..? – चित्रा वाघ

0

खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केले आहे. चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत, असे त्या म्हणाल्या. त्या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ ट्विटरला शेअर करून सुळे यांच्यावर निशाणा साधला. ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर टीका करणाऱ्या या नेत्यांना सोडणार का..? असा प्रश्न विचारला आहे. चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असेही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात भाष्य करताना हे विधान केले. “चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत. त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलत असताना मराठी संस्कृतीला शोभणारे कपडे का घालत नाही? आपण सगळ्या गोष्टींचे पाश्चिमात्यीकरण करत आहोत. काय घालायचे हा त्यांचा प्रश्न आहे. दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात. आत्मनिर्भर भारतात चॅनेलवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही.” असे त्या म्हणाल्या.

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनीही काही दिवसांपूर्वी टिकलीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता, ‘तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रुप आहे. भारत माता विधवा नाही.” असे ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. सुप्रिया सुळे यांनीसुद्धा साडीवरून वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.