पिंपरी चिंचवड |
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पोलीस आस्थापना पायाभूत सुविधा योजनेतून पोलीस वाहने खरेदीसाठी दोन कोटी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले.
या बैठकीला पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी महापौर उमाताई ढोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकरशेठ जगताप, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेवजी ढाके यांच्या सह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.