Latest Marathi News

BREAKING NEWS

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाद केलं..!”

0

मुंबई |

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. यावेळी सत्ताधारांसोबत विरोधक एकाच व्यासपीठावर दिसले. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार आणि भाजपाचे नेते आशीष शेलार यांच्या गटाची युती दिसून आली. यापार्श्वभूमिवर बोलताना “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही”.

आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. २०२४ च्या निवडणुकीमध्ये शरद पवार मोदींना साथ देतील असं आठवले म्हणाले आहेत. असं मोठं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. तसेच, पवारांनी या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांबरोबर युती केली आहे. असही आठवले यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.