पुणे |
पुण्याचे पालकमंत्री म्हणून पदभार घेतल्यापासून चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यासमवेत बैठक आयोजित करीत आहेत. आज २१ ऑक्टोबर रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने, वर्तुळाकार रस्ता या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे , स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प , समाविष्ट गावातील रस्ते आदी प्रमुख पायाभूत सुविधा विकासावर लक्ष केंद्रित करून कामांना गती द्यावी , अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमआरडीएच्या कामकाजाचा आढावा पीएमआरडीए कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार महेश लांडगे, महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त बन्सी गवळी, नगररचना उपसंचालक डी. एन. पवार, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, मुख्य अभियंता अशोक भालकर आदी उपस्थित होते.