बार्शी |
तुकाराम मुंढे अजून प्रशासन व्यवस्थेत रुळले नाहीत का ? असा प्रश्न निर्माण होतो. बार्शीमध्ये प्रशिक्षण कालावधीत मुख्य अधिकारी म्हणून काम करताना शहरातले टपोरीराज संपुष्टात आणणारे तुकाराम मुंढे नंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून आले. अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या होतात.
ते स्वच्छ, कार्यक्षम, पारदर्शी, आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे अधिकारी आहेत, हे आता पुरते स्पष्ट झाले. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असे गोंडस तत्व रूढ झालेल्या प्रशासन व्यवस्थेला वळण लावण्यासाठी तुकाराम मुंढे सारख्या अधिकार्यांजची समाजाला गरज आहे. चिखलातले कमळ असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.