Latest Marathi News

BREAKING NEWS

खासदार डॉ. महास्वामींच्या ‘जात पडताळणी’ची २८ जुलैपासून पुन्हा सुनावणी

0

सोलापूर|

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर सोलापूर पडताळणी समितीला मिळाली आहे. 28 जुलैला समितीचे सदस्य खासदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या फेर पडताळणीची कार्यवाही सुरु करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदारांनी बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर समितीने दक्षता पथक नेमून खासदारांच्या मूळ गावापासून प्रमाणपत्र दिलेल्या तहसील कार्यालयापर्यंतची सर्व कागदपत्रे पडताळून पाहिली. सुनावणीअंती प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.