Latest Marathi News

BREAKING NEWS

तोतया ‘सीबीआय’ अधिकारी छाप्याचा मास्टर माइंड निघाला भाजपा पदाधिकारी

0

 

औरंगाबाद | औरंगाबादच्या पैठण येथील माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर रविवारी एका तोतया ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांने रेड केल्याची घटना समोर आली होती. तर लोळगे यांच्या समयसूचकने या तोतया ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या सर्व घटनेचा खरा मास्टर माइंड भाजपचा एक माजी पदाधिकारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रघुनाथ इच्छैय्या असे या मास्टर माइंडचे नाव आहे.

सुरज लोळगे यांचा भाऊ ज्वेलरी शॉपमध्ये असताना विट्ठल हारगुडे नावाचा व्यक्ती दुकानात आला. त्याच्या हातात एक फाईल आणि डायरी होती. त्यांनतर त्याने लोळगे यांच्या भावाला आपण सीबीआय ऑफिसर असून , तुमच्या दुकानावर रेड पडली असल्याच सांगितले. त्यामुळे सुरज यांच्या बंधूने याची माहिती त्यांना फोनवरून दिली.

तसेच या संदर्भात माहिती मिळताच सुरज दुकानात आले. पण त्यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून संशय आला. त्यामुळे त्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना फोन करून माहिती दिली. त्यांनतर या तोतया ‘सीबीआय’ अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.