Latest Marathi News

BREAKING NEWS

‘भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी फोडली!’ संजय राऊतांच गंभीर आरोप

0

 

महाराष्ट्रात राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचलं असून महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत जलदगतीने घडत आहेत. याला कारणीभूत भाजप असल्याचा आरोप महाविकास आघाडी करीत आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून आरोप-प्रत्योरोप सुरू आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर राजकीय नाट्य दहा दिवस चाललं होत.

संजय राऊत यांनी भाजपाला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली असं विधान केलं आहे. त्यानंतर शिवसेनेला मुंबईत दुबळं करायचं आहे म्हणून भाजपाने शिवसेना फोडली असं देखील वक्तव्य केलं आहे. आज माध्यमाशी बोलताना संजय राऊत आक्रमक शैलीत पाहायला मिळाले. महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय गोष्टीवर त्यांनी आज भाष्य केलं.

तसेच भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना टोला लगावला. देशाचं राजकारण रक्तरंजित होतं चाललं आहे अशी टीका केली. “शरद पवार जे म्हणत आहेत, त्यानुसार मध्यावधी निवडणुकांचा महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल, गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात, अशी माझी माहिती आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.