Latest Marathi News

BREAKING NEWS

‘ज्याचा कुणी नाही, त्याचे आनंद दिघे साहेब होते’; फडणवीसांनी तोंडभरून केले शिंदेंचे कौतुक

0

 

 

मुंबई |  भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला असून शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली.

 

तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून केले आहे. एकनाथ शिंदे हे जनतेचे सेवेकरी आहे. कुशल संघटक आहे. एकनाथ शिंदे जनतेसाठी २४ तास काम करणारा नेता आहे. एकनाथ शिंदेंनी फिल्डवर जाऊन समृद्धी महामार्गाच्या समस्या सोडवल्या, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

 

देवेंद्र फडणवीस यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचंही कौतुक केलं. धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदेंना ऊर्जा दिली, प्रेम दिलं आणि स्वत:च्या घरापेक्षाही समाजाचा विचार करायला हवा, ही भावना रुजवली. ज्याचा कुणी नाही, त्याचे आनंद दिघे साहेब होते. त्यामुळे आनंद दिघेंच्या याच शिकवणीमुळे एकनाथ शिंदे काम करताना दिसतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.