Latest Marathi News

BREAKING NEWS

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंतेत तर सदाभाऊ खोत म्हणाले,

0

मुंबई | काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे. टोमॅटोचा दर दीडशे ते दोनशे रुपये झाल्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर टोमॅटोची अधिक चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर काही मीस्म सुध्दा व्हायरल झाले आहेत. काल सुनिल शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

तसेच दोन दिवसापूर्वी मराठी अभिनेत्याने देखील टोमॅटोच्या बाबत एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. त्याचा सुध्दा खोत यांनी चांगलाचं समाचार घेतला. त्यानंतर त्या अभिनेत्याने आपलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावरुन हटवलं होतं.अवकाळी पाऊस, मान्सूनचं उशिरा आगमन यामुळे पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सामान्य नागरिक वाढलेल्या दरांमुळे अधिक परेशान झाला आहे. टोमॅटो दर इतके वाढले आहेत की, केंद्र सरकार आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून टोमॅटो खरेदी करणार आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, काल बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही असं वक्तव्य सुनिल शेट्टी याने केलं होतं.” या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.