नांदेड |
संभाजी भिडेंच्या आज आणि उद्या होणाऱ्या नांदेड दौऱ्याला मोठा विरोध होत आहे. याबाबत भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवदेन देण्यात आले आहेत.
वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे संभाजी भिडे यांची सभा नांदेडमध्ये १४ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे ही सभा रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
भिडे गुरुजी यांची आज रोजी दुपारी २ वाजता हदगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेस उमरखेड, माहूर व किनवट या ठिकाणचे शिवभक्त तरुण कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्या रोजी दुपारी २ वाजता अंबिका मंगल कार्यालय नायगाव येथे भिडे गुरुजींची सभा व बैठक होणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता नांदेड येथे जाहीर सभा होणार आहे.