पूणे : कोरोनाचा धसका सामन्य माणसाप्रमाणे गुन्हेगारी जगताला देखील बसला होता. लॉकडाऊनच्या काळात क्राईम रेटमध्ये लक्षणीय घट झाली होती. चोरट्यांनी देखील कोरोनाचा धसका घेतला होता.
पण आता यावर देखील चोरट्यांनी मार्ग काढलेला दिसत आहे. पीपीई किट सारखा दिसणारा पेहराव घालून आणि तोंडाला मास्क लावून चोरटे आता चोरी करत आहेत. सीसीटीव्ही मुळे ही बाब समोर आली आहे.
पुण्यातील पाषाण परीसरात अशाच प्रकारचा पेहराव परिधान करून चोरट्यांनी एका रात्रीत चार दुकाने फोडली. दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे पीपीई कीट सारखा पेहराव आणि मास्क घालून दुकानात शिरल्याचे दिसले आहे. पोलिसांनी देखील आपल्या तपासात ही बाब नमूद केले आहे.