Latest Marathi News

BREAKING NEWS

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पाहिलाच पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे : कोरोनाच्या लसनिर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ हे देखील कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा सांगणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे लोकसहभागातून १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी स्क्रिनिंग आयोजित केले होते. चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी स्वतः या सिनेमाला उपस्थित राहून सिनेमाचा थरार अनुभवला. 

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोविडसारख्या महामारीचा सामना करताना आपल्या देशातील वैज्ञानिकांनी केलेले काम अभिनंदनीय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या खंबीर पाठबळामुळे तसेच लस निर्मितीमध्ये वैज्ञानिकांनी सर्वस्व झोकून दिल्याने आज आपण आनंदाने जीवन व्यतीत करत आहोत. या काळातील संपूर्ण घटनाक्रमच रोमांचकारी होता. हा संपूर्ण घटनाक्रम द व्हॅक्सिन वॉर या सिनेमातून दाखविण्यात आला असून, माझ्या कोथरुड मधील नागरिकांसह आज सिनेमाचा थरार अनुभवाला. हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पाहिलाच पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर आणि बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २. ४५ आणि रात्री ९. ३० मिनिटांनी या शो चे आयोजन करण्यात आले होते. . कोथरूड येथील सिटी प्राईड या सिनेमागृहात हा चित्रपट दाखवण्यात आला. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले होते. नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत चित्रपटाचा आनंद घेतला. लसनिर्मितीसाठी  पंतप्रधान मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ हे देखील कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा सांगणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर तसेच अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.