Latest Marathi News

BREAKING NEWS

सहकार भारती पुणे विभागाचा अभ्यास वर्ग आळंदीत संपन्न

0

पुणे |

आळंदी-२१ सहकार भारती ह्या राष्ट्रीय स्तरावर कार्य करत असलेल्या संघटनेच्या पुणे विभागाचा दिनांक २० व २१ ऑगस्ट या दिवशी निवासी अभ्यास वर्ग आळंदीत संपन्न झाला.

केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानं सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्य उभं राहतंय अनेक शासकीय योजना राष्ट्रीय,खाजगी बँकेच्या माध्यमाबरोबरच सहकारी बँका,पतसंस्थांना देखील सहभागी करुन घेणार इतकंच नव्हे तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था देखील बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न असणार आहेत. कालच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले सहकार भारतीचे प्रदेशाध्यक्षा शशिताई अहिरे म्हणाल्या, लवकरच सहकार विद्यापीठ स्थापन व्हावं यासाठी केंद्रीय राज्य पातळीवर सहकार भारती प्रयत्नशील असून सदर विद्यापीठ पुण्यात व्हावं यासाठीही देखील सहकार भारती आग्रही असणार आहे.

सहकारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले सहकार अधिक प्रमाणात सबळ करून अधिकाधिक म्हणजेच शेवटच्या लोकांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी सहकार भारती मोठ्या प्रमाणावर सक्रिय कार्य करीत आहे. सहकार भारतीचे विना संस्कार नहि सहकार, विना सहकार नहि उद्धार। हे ब्रिदवाक्य बरंच काही अधोरेखित करते.

सदर प्रशिक्षण वर्गात अहमदनगर दक्षिण व उत्तर पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर या तीन जिल्ह्यातील सहकार भारतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गास पुणे विभागाचे पदाधिकाऱ्यांचे,सदस्यांचे विशेष परिश्रम लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.