Latest Marathi News

BREAKING NEWS

आमदार संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर दीपक केसरकरांचं विधान

0

 

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून सोबत असलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना काही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच औरंगाबादमधील एका जाहीर कार्यक्रमात आपली नाराजी बोलावून दाखवली आहे.

 

मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे. मी मंत्री अतुल सावेंच्या वडिलांसोबत काम केले आहे. अतुल सावे राजकारणात येतील, असे वाटले नव्हते, पण ते आले. आमदार, राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्रीही झाले. जरा आमच्याकडेही पाहा. राजकारणात आता सिनिअर, ज्युनिअर राहिलंच नाही, अशी खंत जाहीर सभेत व्यक्त केली.

 

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट हे लवकरच होणारे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचं कुठलंही कारण नाही. संजय शिरसाट उत्कृष्ठ आमदार आहेत. आमचे नेते आहेत. त्यांचा योग्य तो मान ठेवला जाणार आहे. मुळात अस्तित्वात असलेले मंत्री होते. त्यामुळे एक-दोनच जागा होत्या. मुख्यमंत्र्यांना देखील मर्यादा होत्या. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून नेत्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.