Latest Marathi News

BREAKING NEWS

आणखी एक पवार मोहित कंबोज यांच्या रडार, ट्विट करून दिला इशारा

0

 

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं ट्वीट करून भाजपचे नेते आणि देवेंद्र फडवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. आता मोहित कंबोज यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. रोहित पवार यांच्याबद्दल अभ्यास करत असल्याचा इशाराच कंबोज यांनी दिला. मोहित कंबोज यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत सूचक ट्विट केलं आहे.

बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे, असा इशाराच कंबोज यांनी रोहित पवार यांना दिला आहे. आधी सिंचन घोटाळा तर आता रोहित पवार यांच्या ॲग्री आणि सहकारी कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

अजित पवारांनंतर आता पवार कुटुंबीयातील दुसऱ्या व्यक्तीवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांची मवाळ भूमिका पाहण्यास मिळाली होती. दरम्यान, मोहित कंबोज यांच्या ट्वीटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील ५२ कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही,अशी टीका त्यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.