पिंपरी , १५ सप्टेंबर : मध्य प्रदेशातील कुदेश्वरधाम येथील पंडित मिश्रा यांच्या श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवारातर्फे सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. याचे औपचारिक उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. आमदार अश्विनी जगताप, कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी एक लाखांपेक्षा अधिक भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला.
मानवी जीवनात ज्ञान, मोक्ष, त्याग, उपवास, तप आणि जप याचे महत्त्व अधोरेखित करणारी तसेच शिव-शक्ती आणि शिव- महिमा याची प्रचिती देणारे शिवचरित्र पुणे जिल्ह्यातील भाविक-भक्तांना श्रवण करता यावे; यासाठी श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान सांगवी येथे होत आहे. यावेळी पंडितजींचे पुणेकरांच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत करुन, सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पुणे सर्वार्थाने धार्मिक जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ या जिल्ह्यात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज यांच्यामुळे आध्यत्म जपलं आहे. अशा पवित्र भूमीत शिवपुराण कथा होणे , हि सर्वांसाठी पर्वणी असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.