Latest Marathi News

BREAKING NEWS

पुणे शहराच्या विकासाच्या गतीमुळे उद्योग क्षेत्राला अनेक संधी निर्माण झाल्या आहेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   

0

पुणे , १५ सप्टेंबर : क्रेडाईच्या वतीने पुणे मेट्रोच्या ४० व्या वार्षिक चर्चासत्राचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले.

पुणे शहराचा पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी चर्चासत्राला शुभेच्छा देताना, पुणे शहराच्या विकासाच्या गतीमुळे उद्योग क्षेत्राला अनेक संधी निर्माण झाल्या आहेत असे अधोरेखित केले. तसेच, मेट्रोच्या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुककोंडीचा प्रश्न सुटत आहे, ते मत व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, चांदणी चौकाच्या प्रकल्पामुळे पुणे मुंबई मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. कात्रज कोंढवाच्या प्रकल्पामुळे या मार्गावरील वाहतूककोंडी सुटेल‌. त्यामुळे भविष्यातही उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी पाठवपुरवा करु. मात्र, बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांनी आर्थिकदृष्ट्या कुटुंबांतील घटकांचा विचार करुन झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) चे प्रकल्प राबवावेत. त्यासोबतच पुण्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठीही छोटे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.