Latest Marathi News

BREAKING NEWS

भाग्यकांता संचलित शब्दरंग मध्ये इकोफ्रेंडली श्रीगणेश (बाप्पा) निर्मिती कार्यशाळेला अभूतपूर्व प्रतिसाद..

0

बार्शी- 17 शब्दरंगच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात पर्यावरणपूरक उपक्रम प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती सार्वजनिक तलावात किंवा विहिरीत विसर्जित करुन पाणी दूषित न करता साध्या मातीचा किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करुन मूर्ती बनवून नंतर तो आपल्या घरात एका कुंडीमध्ये विसर्जन केल्याने त्यापासून एका सुंदर रोपाची निर्मिती होणार आहे. या उपक्रमासाठी सर्वच स्तरातील प्रशिक्षणार्थींनी स्वतःच्या हातांनी गणपती बाप्पा बनवला.
तो बनवत असताना त्यात विविध झाडांच्या बिया समाविष्ट केल्या आहेत. जेणेकरून विसर्जनानंतर झाडांच्या रूपात बाप्पा कायम स्मरणात राहतील.

आपल्या स्वतःच्या हातांनी गणपती बाप्पा बनवण्याचा आनंद निव्वळ अवर्णनीय असतो आणि याची अनुभूती घेण्याची संधी शब्दरंगने सगळ्यांना मिळवून दिली. भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठान पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यामधे अग्रेसर आहे. यापूर्वीही भाग्यकांताने इकोफ्रेंडली सिड बॉल पेन्सिलचे विद्यार्थ्यांना वाटप केले होते.
इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवून त्याचे पर्यावरणपूरक विसर्जन आणि त्यातून वृक्षारोपण अशी समग्र संकल्पना भाग्यकांता संचलित शब्दरंगने राबवली आहे. या कार्यशाळेमधे 120 मूर्ती बनवण्यात आल्या .
या कार्यशाळेसाठी चित्रकार रविंद्र सुतकर आणि शब्दरंगच्या संचालिका श्रद्धा धर्माधिकारी यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

सतीश अंधारे (अध्यक्ष क्रेडाई बार्शी) कार्यशाळेसाठी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेसाठी भाग्यकांताचे कार्यकारी अध्यक्षा सुनिता गाडेकर,सचिवा श्रद्धा धर्माधिकारी, खजिनदार महेश उकिरडे, प्रकल्प प्रमुख गुंजन जैन, प्रकल्प समन्वयक प्राची जमदाडे आणि विद्या काळे शब्दरंग चे सर्व पदाधिकारी डॉ. गौरी गायकवाड, डॉ कैवल्य गायकवाड, हेमंत जमदाडे, विद्या चव्हाण, शिवानी चव्हाण, सौरभ भोइटे, बाळासाहेब चोबे,प्रवीण नाळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.