मुंबई |
उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले असून, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्घाटन केले. वसतिगृहातील अधिक्षकांनी मुलींचे आपण पालक म्हणून जबाबदारी स्विकारावी असे आवाहन यानिमित्ताने केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीतील वसतिगृह अधीक्षक हे अत्यंत महत्त्वपूर्ण पद आहे, अधीक्षकांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्रजी रस्तोगी , उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्रजी देवळाणकर , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोदजी मोहितकर, आयपीएस डॉ.रश्मीजी करंदीकर, सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.