Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शीच्या भगवंत सेना दलाच्या सदस्यांच्या तत्परतेमूळे वाचले आणखी एका युवकाचे प्राण

0

बार्शी |

येडशी रोडवर, घारी हद्दीमध्ये हॉटेल अक्षय च्या समोर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार एक युवक रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच भगवंत सेना दलाचे सदस्य विनायक गरड व अरविंद पाटील घटनास्थळी पोच झाले. यावेळी भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी तात्काळ 108 नंबर वर फोन करून डॉक्टर संतोष जगदाळे, अमर पवार, नवनाथ शितोळे, बाळू पकाले, सयाजी लोखंडे, समाधान डीडवळ यांच्या मदतीने, 108 नंबरच्या रुग्णवाहिकेतून जखमीला पुढील उपचारासाठी बार्शी येथील

डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. जखमी युवकाचे नाव गणेश अपुणे असून हा युवक बार्शीतील मांगडे चाळ येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. जखमीची परिस्थिती गंभीर असून, त्यावर डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये पुढील उपचार चालू आहेत. भगवंत सेना दलाच्या तत्परतेमुळे आणखी एका युवकाचे प्राण वाचल्यामुळे भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.