मुंबई |
आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे त्यांच्या मंत्रिमंडळासह २७ जून रोजी दाखल झालेले आहेत. पंढरपुरातील वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोन्ही मंत्र्यावर सर्व जबाबदारी सोपवली आहे.
आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. अनेक वारकरी बस किंवा इतर वाहनांनी विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. २९ जूनला विठुरायाची महापूजा केली जाणार आहे. पंढरपूरात मोठ्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करणे तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांना समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.