Latest Marathi News

BREAKING NEWS

‘रस्सी जल गई, पर बल नही गया’ चित्रा वाघ यांचा अनिल परबांना टोला

0

मुंबई | अपूर्ण नालेसफाई, अनियमित पाणीपुरवठा अशा विविध नागरी समस्यांनी हैराण झालेल्या खार, वांद्रे व सांताक्रूझ येथील नागरिकांनी सोमवारी ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापालिका ‘एच’ पूर्व विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. मात्र, यादरम्यान तेथे शिवसेना शाखेवर हातोडा चालवणाऱ्यांवर अधिकाऱ्याला पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले.

सदर घटनेवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या घटनेवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. अनिल परबांची ”रस्सी जल गई, पर बल नही गया”, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी परबांना टोला लगावला आहे. कायदेतज्ञ ॲड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली. अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहीजे. अधिकाऱ्यां मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरे गटाकडून पाडला जातोय. अनिल परबांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहीजे, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.

वांद्रे पूर्व ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केल्याने आक्रमक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नागरी प्रश्नांवर जनमत तयार करून पालिका ‘एच’ पूर्व कार्यालयावर मोर्चा काढला. त्यासाठी गेली तीन दिवस जोरदार तयारी सुरू होती. पाच माजी नगरसेवक या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनी शिष्टमंडळातील सदस्य सोडून इतरांना प्रवेश नाकारल्याने मोर्चेकरांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली.

सरकार पालिका आणि पोलिसांविरोधात जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळ पालिका सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांना भेटायला गेले होते. तर काही ठाकरे समर्थक पालिका कार्यालयात आधीच शिरले होते. चर्चेच्या वेळी वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या एका अधिकाऱ्याला बोलावले. त्यामुळे त्यांना पाहून ठाकरे गटाच्या शाखा प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.