सिंधुदुर्ग | पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे, उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी आमदार नेते नितेश राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना राणे यांनी हा गंभोर आरोप केला आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकला. त्यावरून नितेश राणे यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारा की, जे हिंदूंची बदनामी करतात. छत्रपतींची बदनामी करतात त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? याच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, असं नितेश राणे म्हणालेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा की तुम्हाला शिवरायांचा अवमान तुम्हाला चालतो का? असं नितेश राणे म्हणालेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर पंढरपुरात आहेत. काही वेळा आधी त्यांनी विठ्ठल मंदिरात जात दर्शन घेतलं. त्यावर नितेश राणे यांनी टिपण्णी केली आहे. आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले आहेत. केसीआर ही भाजपाची दुसरी टीम आहे असं म्हणणाऱ्यांना हे झोंबलं. शिवसेना ठाकरे गट ही राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असं नितेश राणे म्हणालेत.