सोलापूर |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत.पुणे येथील नागरिकांच्या समस्येला जाणून वाहतूक कोंडीतुन सुटका केली.मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील पूल पाडून चमत्कार केला असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणातुन सांगितले.राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ए.बी.व्ही.पी.च्या सदस्यांनी यश संपादन केले आहे.त्यांचा यथोचित सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता.हा सत्कार कार्यक्रम सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिवस्मारक सभागृहात ठेवण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर त्यांनी निवडून आलेल्या सिनेट सदस्यांना कानमंत्र दिला.