सांगोला दि ३|
अपत्य नसणाऱ्या निराशपालकावर उपचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे चैतन्य टेस्ट बेबी सेंटरचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कमी खर्चात रुग्णांना योग्य पद्धतीने लाभ मिळावा यासाठी हे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर काम करणार आहे.
सांगोला डॉ. केळकर प्रसुतीगृह, स्त्री व बाल रुग्णालय आणि श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले. याप्रसंगी सभागृहातील आ. शहाजीबापू पाटील, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, चेतन सिंह, केदार सावंत, डॉ. बाबासाहेब देशमुख इ. मान्यवर उपस्थित होते.