अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत भाजपची 13 जणांची कोअर कमिटी
संघावर बंदी आणण्याचा अनेकांनी प्रयत्न : चंद्रकांत दादा पाटील
सोलापूर |
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत भाजपची 13 जणांची कोअर कमिटी आहे. ती बसून निर्णय घेत असते. राज्याकडून प्रस्ताव जात असतो आमच्याकडे डिसिप्लिन आहे. आमच्याकडे दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होते. काही पक्षांकडे निवडणुकाच होत नाहीत. आमच्याकडे कोणाला तिकीट पाहिजे असं नसतं इच्छुकांनी आपले पत्र देतात. त्यावर तेरा जणांची कोअर कमिटी निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात केले आहे.
सुप्रिया सुळे संघ बंदीबाबत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संघावर बंदी आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र संघ त्यातून उजळून निघाला वाढत गेला. त्यामुळे याची भीती संघाला कधीच नाही. जे करायचं ते घटनेच्या चौकटीत करा. कारण घटनेच्या चौकटीत संघावरील बंदी कधीच टिकली नाही. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांना कोणीच सिरीयसली घेत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलून त्यांचे महत्त्व कशाला वाढवू. असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना लगावला.
दोन दसरा मिळतील कोणाची भाषण ऐकणार ह्या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अभ्यासक म्हणून वेळ मिळाला तर त्या दोघांसोबतच आणखी कोणाचे असेल तर तेही ऐकतो. मंत्री असल्यामुळे अनेक जण मला भेटतात. अभिजीत पाटील हे देखील कामासाठीच भेटले. विशेषतः मी पहिल्या टर्मला म्हणजे 2014 ते 19 मध्ये आठ खात्यांचा मंत्री होतो. त्यामुळे राज्यात अनेक जण माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात. अभिजीत पाटीलही तसेच प्रश्न घेऊन आले होते.