Latest Marathi News

BREAKING NEWS

गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

0

मुंबई |

मुंबईतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका गोणीत हा मृतदेह होता. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह गोणीत होता. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.