Latest Marathi News

BREAKING NEWS

अखंड महाराष्ट्राच्या भल्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, मुंबईनंतर पुण्यात झळकले बॅनर

0

शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजोय पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर या शपथविधीला शरद पवारांनी पाठिंबा न देता थेट अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांवर थेट कारवाई केली होती तर दुसरीकडे आजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांच्या या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: ठाकरे बंधुंच्या भूमिकेकडे राज्यातील लोकांचं लक्ष आहे. कारण दोन दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यात सुद्धा “ठाकरे बंधूनी एकत्र यावे” अशा मजकुराचे बॅनर लावण्यात आले आहे. पुणे शहरातील अनेक परिसरात हे बॅनर झळकले आहेत. यावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एकत्र लावण्यात आले आहेत. त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राचा मोठा नकाशा आणि हुतात्मा स्मारक लक्ष वेधून घेत आहेत. तमाम मराठी जनतेसाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे, हीच ती वेळ आहे, अशी मागणी या फ्लेक्समधून कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

याआधी मुंबईत शिवसेना भवानासमोर देखील कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यानी मी लवकरच सभा घेऊन भूमिका स्पष्ट करेल अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ठाकरे बंधू कार्यकर्त्यांच्या या मागणीकडे कसे पाहतात हे पाहावं लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.