Latest Marathi News

BREAKING NEWS

धुळ्यात अजित पवारांसह बंडखोरी करणाऱ्या नेत्यांचे झाकले फोटो

0

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथ विधींनंतर राष्ट्र्वादीत शरद पावर आणि अजित पवार असे दोन गट पडल्याचे चित्र दिसून आले होते अशातच आता राज्‍यात सुरू असलेल्‍या घडामोडीनंतर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांसह फुटीरवादी नेत्यांचे फोटो झाकले आहेत.

राष्ट्र्वादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात याचे पडसाद उमटत आहे. याच दरम्‍यान धुळ्यात देखील पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या धुळे राष्ट्रवादी भवन येथील फोटोंना पांढरे कागद चिपकवून या फोटोंना झाकण्यात आले आहेत.

राष्‍ट्रवादी भवनातील रूपाली चाकणकर, छगन भुजबळ व अजित पवार तसेच हसन मुश्रीफ यांचे फोटो झाकण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचा ठाम निश्चय केला असल्याचे व्यक्त करत अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.