Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरेंच भाषण ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दल आदर वाढला; खासदार जलील यांनी केले कौतुक

0

 

औरंगाबाद | राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु असलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यांनतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. मात्र दुसरीकडे राजकीय मतभेद असलेल्या MIM च्या खासदाराने सुद्धा उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आहे. तुमच्या नम्रतेनं सर्व विरोधकांना जोरदार चपराक मिळालीय, असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज यांनी दिली आहे. जलील माध्यमांशी बोलताना त्यांनी हे प्रतिक्रिया दिलेली आहे.

जलील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात प्रामाणिकपणा दिसत होता. माझ्या शिवसैनिकांनी येऊन मी मुख्यमंत्री पदासाठी नालायक असल्याच सांगितले असते तर मी राजीनामा दिला असता असे जे विधान ठाकरे यांनी केलं, त्यात प्रामाणिकपणा होता असे जलील म्हणाले. शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत ते राहणार पण, त्यांच्याबद्दल आज आदर वाढला असल्याच जलील म्हणाले.

मला कोणताही अनुभव नसतांना माझ्यावर मुख्यमंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली. त्यांनतर कोरोना आला पण त्यावेळी मी प्रामाणिकपणे काम केले, या बोलण्यात सुद्धा प्रामाणिकत दिसत होती. मी राजीनामा देण्यासाठी,खुर्ची सोडण्यासाठी तयार आहे असे आजच्या काळात बोलणे यालाही हिम्मत लागते, असेही जलील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.