Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा

0

राज्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताच उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी थेट शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे विधान खासदार विनायक राऊत यांनी केले.

राऊत यांच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिउत्तर दिले आहे. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य या केवळ वावड्या असून, ठाकरे गटाचेच काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लवकरच स्फोट होईल, असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये संघर्ष झाला असल्याच्या बातम्या टीआरपी वाढवण्यासाठी पेरल्या जात असून, सरकार चांगले काम करत असल्याने ते अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी मतदारसंघातील विकासकांमाच्या संदर्भात चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.