Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही? शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल

0

राष्ट्र्वादीत अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर थेट राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर दावा ठोकला तसेच चिन्ह मिळण्यासाठी निवडणूक आयोगाला आमदारांच्या समर्थनाचे पत्र पाठवले याच मुद्द्यावरून आता शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून जाब विचारला आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला आहे.

याबाबतची माहिती निवडणूक आयोगानं देणं अपेक्षीत होतं असं शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं पाठवली आहेत. यामध्ये अजित पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शरथ घेतली. त्यांच्यासह आठ जणांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ३० जून रोजीचे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.