मुंबई । भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला हादरे बसल्यास विधानसभा निवडणुका होतील की नाही हे सांगता येत नाही. कदाचित या निवडणुका होणारच नाही, असं धक्कादायक विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाने नव्या चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुका झाल्याच तर त्या कशा होतील हे देखील सांगता येत नसल्याचा दावाही चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. तसेच त्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कल लढवले जात आहेत. येणारी 2024ची लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्याकरिता अतंत्य महत्त्वाची आहे.
देशाच्या राजकारणाची दिशा हुकूमशाहीकडे चालली आहे. रशिया आणि चीनमध्ये जे झालं तेच भारतात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळाल्यास आपला देश रशिया आणि चीनच्या दिशेने जाणार आहे. देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही, असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
आता निवडणुका ग्राह्य धरून चालणार नाहीत. सोयीप्रमाणे निवडणुका घेतल्या जात आहेत. देशात निवडणुका जिंकण्याकरिता धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे. मतं मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण केले जात आहे. देशात फक्त काँग्रेस सोडून सर्व पक्षांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनाही आमिषं दाखवण्यात आली. मात्र कोणीही विचार सोडला नाही. या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात फक्त काँग्रेसच लढा देऊ शकते, असं चव्हाण म्हणाले.
सीमा हैदरने सचिनसोबत घरावर फडकावला तिरंगा; सनी पाजी’च्या गदर 2 विषयी म्हणाली की,