मुंबई । राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील मंत्री आणि आमदार सतत वादाच्या भोवऱ्यात सापडतायत. अशातच आता व्यवसायिकाच्या अपहरण प्रकरणी प्रकाश सुर्वे यांच्या मुलाचे नाव आल्यानंतर आता दहिसर येथील एका जीवघेण्या खदानीच्या भरणीचे काम करणाऱ्या व्यावसायिकाने आमदार प्रकाश सुर्वे आणि शाखाप्रमुख सुनील मांडवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या उडाली आहे . आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खदानीचे भरणी काम करण्यासाठी आमदार सुर्वे यांच्या सांगण्यावरून शाखाप्रमुख सुनील मांडवे यांनी व्यावसायिकाकडे 12 लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी व्यावसायिक साहेबराव बारकू पवार याने दहिसर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. मात्र पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोपही साहेबराव पवार यांनी केला आहे.
दहिसर पूर्वेकडील काजुबाडा परिसरातील धोकादायक खदान बुजवण्यासाठी साहेबराव पवार यांनी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या महापालिका, पोलीस ठाणे आणि फॉरेस्ट विभागाकडून घेऊन कामास सुरुवात केली. मात्र, हे काम आमदार प्रकाश सुर्वे हे करून देत नसल्याचा आरोप व्यावसायिक साहेबराव पवार यांनी केला आहे.आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे काम करायचे असल्यास 12 लाख रुपये द्यावे लागतील, दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी ६ लाख असे १२ लाख रुपये दिले तरच काम करून देऊ असे आमदार सूर्वेंनी म्हटले असल्याचे साहेबराव पवार यांनी म्हटले आहे.
…. तर विधानसभा निवडणूक होणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठं विधान