Latest Marathi News

BREAKING NEWS

सीमा हैदरने सचिनसोबत घरावर फडकावला तिरंगा; सनी पाजी’च्या गदर 2 विषयी म्हणाली की,

0

पाकिस्तानातून नेपाळमार्गे आपल्या प्रियकराला ४ मुलांसह आलेली सीमा हैदर सध्या चर्चेचा विषय बनत आहे. कोणी म्हणत ते पाकिस्तानी एजंट आहे तर काही चित्रपट निर्माते तिच्यावर चित्रपट सुद्धा बनवत आहे अशातच आता सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीमा हैदरने प्रियकर सचिनसोबत घरी तिरंगा फडकावत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सीमा हैदर आणि सचिन यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे.

कराचीमधून आपल्या नवऱ्याला सोडून भारतात अनधिकृतपणे आलेली सीमा आता ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे सचिन मीनासोबत राहत आहे. सीमावर बेकायदेशीरपणे भारतात घुसणे आणि एका अवैध स्थलांतरिताला आश्रय दिल्याप्रकरणी सचिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात टाकले होते. मात्र, नंतर दोघांना जामीन मिळाला.

2019 मध्ये PubG या ऑनलाइन गेमद्वारे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते.सीमा हैदर म्हणाली की, आज मी माझ्या घरावर तिरंगा फडकवला असून मी फक्त भारताची आहे. यावेळी सीमाने हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि संधी मिळाल्यास गदर 2 चित्रपट पाहायला नक्कीच जाईन असेही सांगितले. यावेळी सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जयच्या घोषणा दिल्या.

मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही : सीमा हैदरसीमा हैदर म्हणाली की, मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. मी स्वत:चा एक व्हिडिओ बनवला होता, पण त्यात अमित जानी यांनी मला खोटे सांगितले की ते आमचे वकील एपी सिंग यांनी पाठवले होते. अशातच मेरठच्या अमित जानीने सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला विरोध दर्शवला आहे.

शिंदे गटातील १० आमदार नाराज; सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

Leave A Reply

Your email address will not be published.