Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रपुरुषांविषयी अनुद्गार काढणे म्हणजे समाज जीवनात अशांततेचे बीज रोवणे

0

यवतमाळ: सध्या भिडे नामक गृहस्थ राज्यात आपली मुक्ताफळे उधळत आहेत. आपण मोठे इतिहास संशोधक आणि सत्यशोधक असल्याची बतावणी करत हे महाभाग राष्ट्रपुरुषांविषयी अनुद्गार काडत आहेत. त्यांची राज्याच्या विविध भागात व्याख्याने होत असून ते जेथे जातील तेथे कायदा व सुव्यवस्थेच्या भंगाच्या घटना घडत आहेत. राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुर्णपणे दूरउपयोग करत सतत वादग्रस्त विधाने करायची आणि सवंग प्रसिद्धी झोतामद्धे राहायचे हे तंत्र भिडे यांनी अवलंबल्याचे दिसते आहे.

हेही वाचा :काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

हेही वाचा :लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थितीबाबत शरद पवार यांचा ठामपणा;म्हणाले,”हे राजकीय सुसंस्कृतपणाचे प्रतिक”

नुकतेच भिडे यांनी राष्ट्रपिता बापुजींबद्दल अत्यंत अशल्य विधाने केली आहेत. स्वत:ला घडवत महात्मा उपाधी धारण करत सत्त्याच्या प्रयोगातून जगाला सत्य, अहिंसा, सत्याग्रह स्वदेशी स्वदेशीबाणा यांची ओळख जगाला करून दिली या जगात भारत देशाचे शांतीदूत म्हणून बापूंकडे पहिले जाते. अशा महाण विभूतिबद्दल व इतरही राष्ट्रपुरुषांविषयी बदनामीचे गरळ ओकून समाजात विखारी व विषारी अपप्रचार करणार्या भिडे यांची हे मोहीम थांबवणे गरजेचे आहे.

हेही वाचा :तान-तनावाच्या उद्रेकातून घेतला निरपराध प्रवाशांसह वरिष्ठांचा बळी

महापुरुषांबद्दल अनुद्गार कडण्याची भिडे यांची पहिलीच वेळ नाही. ते सातत्याने करत असलेले प्रतिमा हणणाचे प्रकार हे सामाजिक सुव्यवस्थेला हानिकारक आहे. त्यामुळे त्यांच्या व्क्तव्याबाबत त्यांच्यावर कारवाही झाली पाहिजे अन्यथा सामाजिक विघटनाचे गंभीर प्रकार उद्भवू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.