लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थितीबाबत शरद पवार यांचा ठामपणा;म्हणाले,”हे राजकीय सुसंस्कृतपणाचे प्रतिक”
पुणे: प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा दिनांक दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. सध्या देशात भाजपा विरोधी राजकीय पक्षाची एकजूट करण्याचे काम सुरू आहे. या विरोधी आघाडीच्या बैठकी देशातील प्रमुख शहरांमध्ये होत आहेत. या बैठकांमध्ये शरद पवार यांची उपस्थिती आणि भाषणे ही लक्षवेधी आहेत. तसेच राष्ट्रवादी मध्ये नुकतीच मोठी फुट पडली आहे. शरद पवार यांच्या विरोधाला नजुमानता अजित पवार यांनी भाजपाप्रणीत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :तान-तनावाच्या उद्रेकातून घेतला निरपराध प्रवाशांसह वरिष्ठांचा बळी
राष्ट्रवादी मधील बंडास भाजपचा पूर्णपुणे पाठिंबा आहे. हे उघड आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांमध्ये भाजपबद्दल प्रखर विरोधाची लाट आहे. तसेच या पुरस्कार प्रदान समारंभाच्या वेळी राज्यसभेत एका महत्वाच्या विधेयकावर मतदान होणार आहे. या समारंभा ऐवजी या मतदानावेळी पवारांनी उपस्थित राहावे. असा (AAP)आप नेते अरविंद केजरिवाल यांचा आग्रह आहे. मात्र आपण पुरस्कार समारंभास उपस्थित राहणार असल्याचे पवारांनी ठामपणे संगितले आहे. पवारांची ही भूमिका त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सूसंकृत पणाचे प्रतिक आहे. असेच म्हणावे लागेल.