Latest Marathi News

BREAKING NEWS

दहशदवादाचे लोन पसरतय नागरिकांनी जागरूक झाले पाहिजे

0

पुणे: नुकतेच दोन दहशदवाद्यांना पुणे इथे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळ बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे क्षमता असणारे साधने व इतर सामग्री सापडली आहे. त्यांच्या माध्यमातून सुरू असणार्‍या देशविरोधी कारवाया व त्यांच्या आश्रयदात्यांचा शोध सध्या (ANI)एनआयए व (ATS)एटीस कडून सुरू आहे. (ISS)आयएसएस या दहशदवादी संघटनेचे जाळे देशभरात पसरविण्यासाठी हे दहशदवादी प्रयत्न करत असल्याची माहिती या दहशदवाद्यांच्या तपासा अंती पुढे आली आहे. त्यांना सहकार्य करणार्‍यांमध्ये एका डॉ पर्यंत पोलिस पोहोचले आहे.

हेही वाचा :राष्ट्रपुरुषांविषयी अनुद्गार काढणे म्हणजे समाज जीवनात अशांततेचे बीज रोवणे

हेही वाचा :काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

आपला देश सातत्याने प्रादेशिक व धार्मिक अस्मिते मधून उधभवलेले अतिरेकी कारवाया, सीमे बाहेरून येणारे घुसखोर नक्षलवादी, मूलतत्ववादी विघटनवादी अतिरेकेंच्या खुरापतींना तोंड देत आहेत. या अतिरेक्यामुळे देशांतर्गत शांततेला मोठे ग्रहण लागले आहे. या अतिरेकी हल्ल्यामध्ये आजपर्यंत हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या कारवायांचा देशाच्या शेयर बजरांपासून ते परकीय गुंतवणुकीपर्यंत अनेक आघाढ्यांवर दुशपरिणाम होत असतात. त्यामुळे नागरिकांनी अशा अतिरेक्यांबाबत जागरूक आणि कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे.आपल्या परिसरातील संशयास्पद व्यक्ति संघटना व हालचालींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले पाहिजे.देशभक्ती ही आपल्या राष्ट्रीय हितबाबत जागरूक राहूनही पार पडता येते. अतिरेक्यांचा उपद्रव या देशासाठी घातक आहे आणि तो टाळण्यासाठी नागरिकांनी कायम पोलिसांच्या खबर्यातची भूमिका बजावली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.