Latest Marathi News

BREAKING NEWS

आर्यन शुगरच्या थकीत २१ कोटींच्या एफआरपी संदर्भात आठ दिवसात निर्णय घ्या

जिल्हाधिकारी शंभकर यांचे निर्देश

0

सोलापूर |

आर्यन शुगर या साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची ( एफ.आर.पी. ) २१ कोटी रुपये रक्कम जमा करणे संदर्भात आठ दिवसांत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी आर्यन शुगर या साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कम २१ कोटी वसुली बाबत बैठक आयेाजित केली हेाती. सदर बैठकीस आमदार राजेंद्र राऊत, साखर संचालक, जिल्हा उपनिबंधक, सरव्यवस्थापक- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, तहसिलदार बार्शी व ॲड. सागर रोडे उपस्थित होते.

सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सुमारे एक ते दीड तास चालली. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन कारखाना खरेदीदार यांनी कारखाना खरेदी केल्यानंतर संपूर्ण ६८ कोटी रुपये बँकेकडे भरलेले आहेत. साखर संचालक यांचे आदेशाने जिल्हाधिकारी यांना एफ.आर.पी. ची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराने जिल्हाधिकारी साहेब यांनी बँकेचे अधिकारी यांना रक्कम किती दिवसांत शासनाकडे जमा करणार याची विचारणा केली. तसेच कारखाना हस्तांतर झाला तरी शासनाचा बोजा हा जमीनीवर व मशिनरीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी. २१ कोटींची रक्कम ही द्यावीच लागेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांना सदरची रक्कम भरणे बाबत काय निर्णय होणार व केव्हा जमा करणार याबाबत आठ दिवसांत निर्णय घ्या असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.