भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल करत आहे. याचदरम्यान, चंद्रकांत पाटील आणि अंधारे हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी पाटील यांनी अंधारे यांना टोला लगावला आहे.
पुण्यातील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाला हजर राहिले होते. एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना चंद्रकांत पाटलांनी यांनी अंधारेंना डिवचले. सध्या सुषमा अंधारे अंधारातून खूप प्रकाशात आल्या आहेत. दिवसांतून चार-पाच वेळा त्यांना आपण टीव्हीवर पाहत आहोत. याला भाग्य म्हणतात. सहा-आठ महिन्यांपूर्वी सुषमाताई अशा प्रसिद्धीच्या झोतात कधीच नव्हत्या.
महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली, यावर अंधारे यांनी भाष्य केले. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेकीची घटना निषेधार्ह व चुकीची आहे. पण पाटील यांचा शब्दही चुकीचा आहे. मी माझी शाई कुठे वापरावी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे. मात्र भाजपचेच नेते सातत्याने अशी वक्तव्य का करत आहेत?असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
अंधारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांनाच पत्र पाठवून याबाबत कळवले आहे. यावेळी त्यांनी पत्रात भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल केले जात असलेल्या वादग्रस्त वक्ततव्यांवरुन सडकून टीका देखील केली आहे. मी संस्थेच्या कामाविषयी काही बोललो नाही. त्यामुळे आपण राजीनामा मागे घ्यावा” अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत.