Latest Marathi News

BREAKING NEWS

‘निर्भया फंड’मधून खरेदी केलेली वाहने शिंदे गटाच्या खासदार-आमदारांच्या सुरक्षेसाठी ?

0

सध्या विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस सरकारला घेरतात दिसून येत आहे अशातच आता पुन्हा एकदा विवधकांनी शिंदे गटावर आंभीरआरोप लगावला आहे. जूनमध्ये, मुंबई पोलिसांनी ‘निर्भया फंड’ अंतर्गत प्राप्त झालेल्या 30 कोटींहून अधिक खर्चाच्या 220 बोलेरो, 35 अर्टिगा, 313 पल्सर बाइक आणि 200 अॅक्टिव्हा खरेदी केल्या होत्या. ही वाहने महिलांविरोधातील गुन्हेगारीशी लढण्यासाठी खरेदी करण्यात आली होती परंतु यापैकी काही वाहने सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील आमदार आणि खासदारांना ‘वाय-प्लस’ सुरक्षा देण्यासाठी वापरली जात आहेत. पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

महिलांच्या सुरक्षेपेक्षा सत्ताधारी आमदारांची सुरक्षा महत्त्वाची आहे का, असा सवाल करत विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला. महिला सुरक्षेशी संबंधित योजना राबविण्यासाठी केंद्राकडून 2013 पासून ‘निर्भया फंडा’द्वारे राज्य सरकारांना निधी दिला जात आहे. “जूनमध्ये वाहने खरेदी केल्यानंतर, ते जुलैमध्ये सर्व 97 पोलिस स्टेशन, सायबर, वाहतूक आणि किनारी पोलिस युनिट्सना वितरित करण्यात आले.

अधिकारी म्हणाले, “या वाहनांपैकी 47 मुंबई पोलिसांच्या बोलेरो आहेत. अनेक पोलिस ठाण्यांची मागणी करण्यात आली होती. राज्य पोलिसांच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या आदेशानंतर मोटार वाहतूक विभागाने, शिंदे गटातील खासदार आणि आमदारांना ‘वाय-प्लस’ सुरक्षा प्रदान करण्यासाठी या वाहनांची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते, असे त्यांनी सांगितले.
या खासदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात आलेल्या गाड्यांपैकी १७ वाहने आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर पोलिस ठाण्यांना परत करण्यात आली. “परंतु 30 बोलेरो अद्याप परत आलेल्या नाहीत, ज्यामुळे संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या गस्तीवर परिणाम झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.