Latest Marathi News

BREAKING NEWS

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईहल्ल्याविरोधात पुणे, पिंपरी- चिंचवड येथे निषेध आंदोलन

0

पुणे |

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड शाई हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथे आज निदर्शने करण्यात आली. पुण्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी  जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली.  विचारांचा सामना विचारांनी करता येत असातानही जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पाटील यांच्यावर  शाई हल्ला केला. चंद्रकांत पाटील  यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करुनही हा चीड आणणारा प्रकार घडला. या प्रवृत्तीविरोधात आणि विशेषत: हल्ल्याच्या मास्टरमाईंडवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत निंदनीय  कृत्याचा निषेध आज नोंदवण्यात आला.  

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करूनही त्यांच्याबाबत अशा प्रकारे घटना घडल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुण्यात अशा प्रकारे निदर्शने करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली कि, चंद्रकांत पाटील यांच्यावर जो हल्ला झाला तो पूर्वनियोजित होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.  राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाले. अशा चांगल्या घटनांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयन्त करत आहे. जातीपातीच राजकारण निर्माण करत आहे, या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत असे जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.  

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक, मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड येथे देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निषेध नोंदवण्यात आला.  पिंपरी- चिंचवडच्या लौकिकाला गालबोट लावणाऱ्या या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. यावेळी माजी महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे, आमदार सौ. उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.