कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
‘सत्तार यांचं हे संतापजनक वक्तव्य आहे, त्याचा निषेध करतो. सत्ता डोक्यात नाही गेली पाहिजे. आम्ही आता शांत आहोत पण कायमच शांत राहू अस नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी थेट इशारा दिला. तसंच, ओला दुष्काळ जाहीर केला तर आम्ही त्यांचे वक्तव्य विसरून जाऊ, असंही पवार म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या विधानावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रोहित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारला कडक इशारा दिला आहे. ‘अब्दुल सत्तार यांचं हे संतापजनक वक्तव्य आहे, त्याचा निषेध करतो. सत्ता डोक्यात नाही गेली पाहिजे. आम्ही आता शांत आहोत पण कायमच शांत राहू असं नाही.
कुठल्या तरी पार्टीचा बदला घ्यायचा म्हणून हे सरकार आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्याची दखल घ्यावी’ अशी मागणी रोहित पवारांनी केली. ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर आम्ही त्यांचे वक्तव्य विसरून जाऊ, अनेक नेते असं बोलले आहेत.
नेते सोडा पण गव्हर्नर सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, असंही रोहित पवार म्हणाले. ‘महाराष्ट्र हिताचे निर्णय घेणे गरजेचं आहे. एका मंत्र्यांकडे अनेक जबाबदारी असतील त्याला निर्णय घेता येत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले, ‘अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्र बाहेर चालले आहेत त्यामुळे बेरोजगार होत आहे. बदला घेण्यासाठी तुम्ही पक्ष फोडता आणि सत्तेत येता.
मग सर्व सामान्य लोकांचे काय? खोक्याची देवाणघेवाण करता. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे पवारांविरोधात बोलायची स्पर्धा लागली आहे.हे लोक पदासाठी बोलत आहेत, अशी टीकाही रोहित पवारांनी केली. ‘अमरावतीला राणा विरुद्ध बच्चू कडू अशी लढाई लागली आहे. राणा अस म्हणत होते की, कडू यांनी 50 खोके घेतले. राणा हे फडणवीस यांच्या जवळचे आहेत.