Latest Marathi News

BREAKING NEWS

राजकारण ठेवा बाजूला ! सलाम त्याच्या जिद्दीला.!!

0

मुंबई |

महाराष्ट्राच्या भूमीत राहूल गांधी यांची “भारत जोडो” यात्रा दाखल झाली आहे. राहूल गांधींच्या जिद्दीचा हा प्रवास अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत सुरु आहे.त्या पार्श्वभूमीवर मशालधारी राहूल यांच्या छायाचित्रावर ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांनी केलेले ललित-काव्य मनाचा ठावा घेतल्या शिवाय राहत नाही!
-राजा माने.

संजय जेवरीकर यांचे ललित-काव्य
तो आलाय महाराष्ट्राच्या धर्तीवर
एक आश्वासक चेहरा घेऊन..
भेटतोय सहज,सोप्या पद्धतीने
आनंदाचा थवा घेऊन..

राजकारण ठेवा बाजूला
त्याच्या प्रयत्नाला सलाम आहे..
उद्याच्या भारताचा तरुणाईचा
तो खरा आशावाद आहे..

मरगळलेल्या अवस्थेतही
तो खूप आव्हान उभे करतोय..
खादीवर चढलेल्या धुळीला झटकून
टी शर्ट,शूजवर आणतोय..

आज देश एकतर्फी वाटत असतानाही
तो बदल घडवण्याची आशा भरतोय…
तरुणांच्या मनाचा ठाव घेत
तो उद्याच्या भारताची वाट दाखवतोय..

विरोधकांच्या मनाच्या कोपऱ्यात
एक बारीकशी धडकी भरली आहे..
वरून दाखवता येत नसले तरी
ती सल मनाच्या कोपऱ्यात सलत आहे..

संजय जेवरीकर
पत्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.